गोराई १ परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा (२६ जानेवारी, २०१६)

प्रतिवर्षी प्रमाणे साहेब प्रतिष्ठान, गोराई आणि शिवसेना शाखा क्र. १७ यांच्या संयुक्त विद्यमाने गोराई १ परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी, २०१६ रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडला. गोराई मधील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक श्री. चितळे यांच्या शुभहस्ते तथा निवृत्त नौदल अधिकारी श्री. शांताराम वेदक यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. बालसंस्कार शिबिरातील आमचा बालमित्र कु. श्लोक रणदिवे याने जोशपूर्ण कविता गावून वातावरणात गंभीरता आणली.

Scroll to Top