साहेब प्रतिष्ठान गोराई आयोजित “जागतिक महिला दिन आणि महिला प्रबोधन” प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साहेब प्रतिष्ठान गोराई या संस्थेच्या वतीने “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून शनिवार दिनांक ९ मार्च, २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता गोराईचा राजा क्रीडांगण, गोराई १, बोरिवली पश्चिम येथे एका “महिला आनंद मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सौ तृप्ती वालोटिया (मधुमेह तज्ञ, समुपदेशक आणि जीवन विषयक प्रशिक्षक) यांनी प्रबोधक या नात्याने महिलांना तणावमुक्त जीवन कसे जगावे, या विषयावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. त्यांना शाल, श्रीफळ, तुलसीरोप व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेली ९ वर्षाहून अधिक काळ विश्वसंत वामनराव पै प्रणीत जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून निस्वार्थी भावनेने बालसंस्कार वर्ग चालवणाऱ्या श्रीमती ज्योती भंडारी व महिला सक्षमीकरणासाठी नानाविध मार्गाने कार्यरत असणाऱ्या सौ उमा धामणकर यांना त्यांच्या विशेष कर्तुत्वाबद्दल शाल, श्रीफळ, तुलसीरोप व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. विभागातील २ महिला सफाई कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येऊन त्यांना देखील साडीचोळी व विशेष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस काही प्रश्नोत्तराचे आणि बैठे खेळ घेण्यात येऊन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच लकी ड्रॉ द्वारे ३ महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होऊन निरोप प्रसंगी उपस्थित प्रत्येक भगिनीस महिला दिनाची आठवण भेट देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना माजी नगरसेविका सौ संध्या दोशी, कॉँग्रेस माजी नगरसेविका सौ श्वेता कोरगावकर परब, महिला उपविभाग संघटिका आणि प्रतिष्ठानच्या सल्लागार सौ अश्विनी सावंत, बोरिवली विधानसभा समन्वयक सौ मीनाक्षी चांदोरकर, महिला शाखा संघटक सौ प्रेरणा राणे, शाखा क्रमांक 9 आणि 16 च्या महिला कार्यकर्त्या, स्वयंप्रेरणा संस्थेच्या सर्वेसर्वा सौ संगीता शिंगटे, जीवन विद्या मिशनचे असंख्य नामधारक तथा विभागातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख श्री उदेशजी पाटेकर, महिला विभाग संघटक सौ सुजाता शिंगाडे, भाजप माजी नगरसेविका सौ अंजली खेडेकर, मुंबई महापालिकेचे आर मध्य विभाग, बोरिवली पोलिस ठाणे, अखिल गोराई सार्वजनिक उत्सव समिति तथा युवती उपविभाग संघटक प्रियंका साळगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिष्ठानच्या वतीने संगीता नलावडे, स्वप्नील हांदे, अंकिता चव्हाण, ओंकार कांबळे, तीर्थराज जांभूळकर, पद्माकर पाटील, प्रवीण सावंत, रवींद्र सडविलकर, विलास पांगेरकर, अरुण जाधव, गीता आंबेकर, पल्लवी पाटील, प्रणाली जाधव, प्रतीक शिर्के यांनी अथक मेहनत घेतली. नुकतेच दिवंगत झालेले प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य कै विवेक नाईक यांची उणीव मात्र मनाला वेदना देऊन गेली.