जागतिक महिला दिन – २०२२

जागतिक महिला दिन – ८ मार्च २०२२ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साहेब प्रतिष्ठान गोराई या संस्थेच्या वतीने गेल्या ९ वर्षातील सलग ३ ऱ्या वर्षी मंगळवार दि ८ मार्च, २०२२ रोजी “जागतिक महिला दिन सोहळा” आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम गोराईचा राजा क्रीडांगण, गोराई १, बोरिवली पश्चिम येथे संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न झाला. साधारण ३५० महिलांनी याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शविली. योगा आणि मार्शल आर्ट तज्ञ सौ माधुरी काटकर यांनी “महिला स्वसंरक्षण” या विषयावर उपस्थितांचे प्रात्यक्षिकासह प्रबोधन केले. शिक्षिका आणि राष्ट्रीय कीर्तनकार सौ प्रवेशाताई भोईर, महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका आणि समाजसेविका सौ मनिषाताई पाटील, डायडम २०२१ उपविजेती आणि रॅम्पवॉक विजेती कुमारी सायली सावंत आणि हिमालयातील गंगोत्री १ शिखर पादाक्रांत करणाऱ्या कुमारी स्नेहा तळवटकर यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाची आठवण म्हणुन सौ संध्या विपूल दोशी यांच्याकडून आठवण भेट देण्यात आली. तसेच लकी ड्रॉ मध्ये विजेत्या ५ महिलाना विशेष भेटवस्तु प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी या नात्याने महिला विभाग संघटक सौ सुजाता शिंगाडे, शिक्षण समिती अध्यक्ष सौ संध्या दोशी, महिला उपविभाग संघटक सौ अश्विनी सावंत, शाखा ९ च्या महिला शाखा संघटक सौ उषा सावंत, स्वयंप्रेरणाच्या सुजाता शिंगटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अंकिता चव्हाण हिने तर प्रास्ताविक सौ संगिता नलावडे यांनी केले. कुमारी संस्कृती भंडारी यांच्या आवाजातील पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमकार कांबळे, प्रियंका साळगावकर, अंकिता चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यास नितीन पाटिल, पद्माकर पाटिल, विलास पांगेरकर, अनिल राठोड, रविंद्र सडवीलकर, गीता आंबेकर, अनुराधा परब, ज्योती भंडारी, तनुजा पाटिल, प्रणाली जाधव, पल्लवी पाटिल, स्नेहल पाटिल, दीक्षा शिंदे यांची उत्तम साथ लाभली.

Scroll to Top