साहेब प्रतिष्ठाण, गोराईच्या वतीने आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना तथा गोराईमधील तमाम जनता जनार्दनाच्या सहभागाने गोराई १ परिसरात सलग तिसऱ्यांदा गुढीपाडव्या निमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मा. नगरसेवक विजय दारुवाले, शिवसेना उपविभागप्रमुख विजय वालावलकर, महिला उप विभाग संघटक शोभाताई पानसरे, स्थानिक नगरसेविका सौ. संध्याताई दोशी या प्रभृतींनी विशेष उपस्थिती दर्शविली. स्थानिक शाखाप्रमुख आणि प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक पांडुरंग देसाई तथा महिला शाखा संघटक सौ. सुजाता शिंगाडे यांनी या यात्रेचे नेतृत्व केले. शिवम परिवाराचे श्रीमान संजयजी भोसले, समाजसेविका सौ. हिराबाई वाकचौरे, समाजसेवक श्री. विपुल दोशी तथा शाखा ८ चे शाखाप्रमुख श्री. रघुनाथ ताम्बोकार यांचे विशेष सहकार्य लाभले. या सर्व मान्यवरांचे, गोराई मधील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आणि यात्रेत सामील झालेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.