साहेब प्रतिष्ठान, गोराई आयोजित ‘किल्ले स्पर्धा – २०१५

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साहेब प्रतिष्ठान, गोराई या संस्थेच्या वतीने आणि श्रीमान विपुलजी दारुवाले यांच्या सौजन्याने “किल्ले स्पर्धा – २०१५” चे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी स्पर्धक संख्या कमी असली तरी स्पर्धकांनी दाखविलेला उत्साह आणि मेहनत अभूतपूर्व अशी होती. या सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक आभार. संस्कार, संस्कृती, परंपरा यांना विस्मृतीच्या पडद्याआड जाण्यापूर्वी त्यांचे संवर्धन करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यापुढेही आपणाकडून असाच भरघोस प्रतिसाद लाभेल, असा विशास बाळगतो. या स्पर्धेसाठी परीक्षक या नात्याने सजावटकार व इतिहास अभ्यासक श्री बाळ साळसकर व डॉ. आनंद हेडाऊ यांनी काम पाहिले. त्यांचेही मनपूर्वक आभार. तसेच आम्हांस सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या श्रीमान संजयजी भोसले, श्रीमान पांडुरंगजी देसाई तथा श्रीमान रघुनाथजी ताम्बोकार यांचेही आभार.

Scroll to Top