साहेब प्रतिष्ठान – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (१५ ऑगस्ट, २०२२)

१५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपूर्ण हिंदुस्थान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. त्यानिमित्त केंद्र तथा राज्य शासनाद्वारे नानाविध उपक्रम संपन्न होणार आहेत. राज्यात आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत आपल्या प्रत्येकाची रक्षा करणाऱ्या पोलिस बांधवासाठी काहीतरी करावे या कल्पनेतून साहेब प्रतिष्ठान – गोराई या संस्थेच्या माध्यमातून प्रथमच चारकोप पोलिस ठाण्यात सोमवार दि १५.०८.२०२२ रोजी सकाळी ८ ते १२ या कालावधीत “मोफत वातविकार व वेदना निवारण शिबिराचे” आयोजन करण्यात आले. विख्यात फिजीओथेरापिस्ट श्री रोहन सावंत आणि आयुर्वेदाचार्य सौ गौरी सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर संपन्न झाले. त्यासाठी चारकोप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री मनोहर शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावून जागा उपलब्ध करून दिली. चारकोप पोलिस ठाणे तथा विभागातील अनेक पोलिस बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमापूर्वी प्रतिवर्षीप्रमाणे सकाळी ८.०० वा श्रीगणेश मंदिर चौक येथे प्रतिष्ठानच्या वतीने विश्वस्त पद्माकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सौ संगीता नलावडे तथा विश्वस्त विलास पंगेरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Scroll to Top