साहेब स्मृतीदिन – १७ नोव्हेंबर २०२१ साहेब प्रतिष्ठान – गोराई या संस्थेच्या वतीने सलग ९ व्या वर्षी “दिवाळीतील दुर्ग बांधणी स्पर्धा” आणि जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त “देश पातळीवरील व्यंगचित्रकला स्पर्धा” यांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी अर्थात १७ नोव्हेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता सेंट रॉक हायस्कूल, गोराई २, बोरिवली पश्चिम येथे संपन्न झाला. या सोहळ्यास अतिथी या नात्याने उपविभाग प्रमुख श्री पांडुरंग देसाई, बोरिवली विधानसभा संघटक श्री संजय भोसले, राष्ट्रीय कीर्तनकार व शिक्षिका सौ प्रवेशाताई भोईर, दुर्गबांधणी स्पर्धेचे परीक्षक तथा ट्रेकक्षितिज संस्थेचे सर्वेसर्वा श्री राहुल मेश्राम, वाहतूक सेनेचे सचिव विशाल पडवळ, युवासेना मुंबई सचिव साक्षेप जेधे, युवासेना विभाग अधिकारी महेश मोहिते उपस्थित होते. शिवचरित्राशी सद्य परिस्थितीशी कशी सांगड घालता येईल यावर सुंदर विचार सौ प्रवेशाताई भोईर यांनी मांडले. तर परीक्षक श्री राहुल मेश्राम यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना छान छान टिप्स दिल्या. व्यंगचित्रकला स्पर्धेतील मोठ्या गटाचे परीक्षण सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री प्रभाकर वाईरकर यांनी तर छोट्या गटाचे परीक्षण श्री अरविन्द गाडेकर, संगमनेर यांनी केले. दुर्ग बांधणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक चारकोप मातोश्री सोसायटी प्लॉट क्र १११, द्वितीय पारितोषिक चारकोप ओमसाई दर्शन प्लॉट क्र ८२९, तृतीय पारितोषिक मल्हारी ग्रुप प्लॉट क्र १२० यांनी पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक गोराई विश्वामित्र प्लॉट क्र १००, गोराई आकांक्षा प्लॉट क्र १०१, गोराई शुभम प्लॉट क्र १५१, चारकोप जीवनसंध्या प्लॉट क्र २६९ यांना देण्यात आले. सर्व विजेत्याना आकर्षक चषक व रोख रक्कम तथा उर्वरित स्पर्धकांना सहभागाबद्दल स्मृतिचिन्ह व रोख रक्कम प्रदान करण्यात आली. व्यंगचित्रकला स्पर्धेतील मोठ्या गटात प्रथम क्रमांक वैष्णवी वाणी, द्वितीय क्रमांक विनीत कदम, तृतीय क्रमांक राधा सामंत तर उत्तेजनार्थ शुभांगी शिंदे यांनी पटकावला. व्यंगचित्रकला स्पर्धेतील छोट्या गटात प्रथम क्रमांक सानिया यादव, द्वितीय क्रमांक यश बेर्डे, तृतीय क्रमांक आकांक्षा चव्हाण तर उत्तेजनार्थ मनोमय नार्वेकर यांनी पटकावला. सर्व विजेत्याना आकर्षक चषक तथा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले व इतर स्पर्धकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. यावर्षी देखील महाराष्ट्रा बाहेरील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अभय आंगचेकर यांच्या दोन दिवासपूर्वीच संपन्न झालेल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे ६० दिव्यानी औक्षण करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे त्यांना विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती आठवण भेट म्हणून प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु अंकिता चव्हाण हिने केले तर आभार प्रदर्शन सौ संगीता नलावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण सावंत, राजू पाटील, दत्ता चव्हाण, पद्माकर पाटील, विलास पंगेरकर, तीर्थराज जांभूळकर, प्रथमेश घोलप, विवेक नाईक, स्वप्नील हांदे, ओमकार कांबळे, अनुराधा परब, प्रियंका साळगावकर, मीनाक्षी चांदोरकर, प्रेरणा राणे या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले. शिवसेना नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा सौ संध्याताई दोशी, उपविभाग प्रमुख श्री पांडुरंग देसाई, बोरिवली विधानसभा समन्वयक श्री संजय भोसले तथा प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य श्री अनिल राठोड यांनी या उपक्रमास अर्थसहाय्य केले. त्यांचे मनपूर्वक आभार ! कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सेंट रॉक शाळेचे श्री राजू देसाई यांचे व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संजय भोसले यांचे देखील खूप खूप आभार ! साहेब प्रतिष्ठान – गोराई