दुर्ग बांधणी स्पर्धा : २०२१ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साहेब प्रतिष्ठान गोराई या संस्थेच्या वतीने सलग नवव्या वर्षी “दिवाळीतील दुर्ग बांधणी” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे परीक्षण रविवार दि ७ नोव्हेंबर, २०२१ रोजी करण्यात आले. परीक्षक या नात्याने ट्रेकक्षितिज या संस्थेचे श्री राहुल मेश्राम यांनी काम पाहिले. संध्याकाळी ४ ते रात्री १ वाजेपर्यंत चाललेल्या या परीक्षणात निस्वार्थी भावनेने आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. दहिसर पूर्व ते मालाड मालवणी येथील २५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. रविवार दि १४ नोव्हेंबर पर्यन्त हे किल्ले पाहता येतील. दरवर्षी क्रमांक १, २, ३ आणि १ उत्तेजनार्थ पारितोषिक तथा सहभाग कर्त्यानादेखील पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते. परंतु या वर्षी अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत ४ उत्तेजनार्थ पारितोषिके देणे क्रमप्राप्त झाले आहे, असे अप्रतिम किल्ले बांधले गेले. शिवसेना नगरसेविका आणि शिक्षण समिति अध्यक्षा संध्या दोशी आणि शिवसेना बोरिवली विधानसभा संघटक श्री संजय भोसले यांनी या स्पर्धेचा बराचसा आर्थिक भार उचलण्याचा शब्द दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते तीर्थराज जांभूळकर, प्रियंका साळगावकर, अंकिता चव्हाण, ओमकार कांबळे, स्वप्नील हांदे यांनी अथक परिश्रम घेतले.