आमच्या बद्दल

साहेब प्रतिष्ठान गोराई

नोंदणी क्रमांक : जी. बी. बी. एस. डी. ७५८/२०१५, मुंबई, महाराष्ट्र राज्य

                     देव, देश आणि धर्म या त्रिसूत्री वर आधारित शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहून समाजाच्या उत्कर्षाचे स्वप्न उराशी बाळगत आम्ही समविचारी मंडळी 17 फेब्रुवारी, 2013 रोजी एकत्र आलो. आजही बाळासाहेबांच्या विचारानुसार हिंदुत्वासाठी आणि मराठीसाठी कार्य करताना भरकटलेल्या हिंदू बांधवांचे प्रबोधन आणि “मराठी बोला चळवळ” तथा “मराठी शाळा टिकवा अभियान ” या अंतर्गत बहुमूल्य योगदान करत आहोत….

साहेब प्रतिष्ठान गोराई Logo - Saheb Pratishthan Logo

                     दरवर्षी सरासरी ६०-७० मुलांना “बालसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून संस्कारित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. “दुर्ग बांधणी” स्पर्धेच्या माध्यमातून तरुण पिढीत इतिहासाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्तुत्ववान महिलांचा गौरव आणि महिला प्रबोधन याद्वारे स्त्री शक्ती सबळ करत आहोत. नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने समाज एकसंघ राखण्याचा प्रयत्न करत आहोत. जागतिक किर्तीच्या व्यंगचित्रकारांच्या देशात व्यंगचित्रकारांची पिढी उभी करत आहोत. कोरोना काळात प्रतिष्ठानचा खजिना रिता करून अनेकांच्या चुली जळत राखण्याचा प्रयत्न आम्ही केला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत राहिले.  

                     प्रतिष्ठानच्या सामाजिक चळवळीचा फायदा थेट गरजू विद्यार्थ्यांना लाभावा यासाठी यावर्षीपासून शिष्यवृत्ती देण्याचा मानस आहे. तसेच, आर्थिक अडचणींमुळे शाळेची फी न भरल्यानमुळे परीक्षेला बसता येत नाही, अशा विद्यार्थ्यांची फी देखील भरण्याचा मानस आहे. 

                     परमेश्वराची असीम कृपा, श्री शिवछत्रपती आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद, देणगीदार, हितचिंतक तथा विभागीय जनतेच्या शुभेच्छा तसेच प्रतिष्ठानच्या सभासदांचे अविरत अन निस्वार्थी परिश्रम यांच्या बळावरच पुढील मार्गक्रमण निर्वेध सुरू राहील. आपणा सर्वांचा लोभ असावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढत जावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

Scroll to Top